बारावीनंतर करता येणारा बी.एस्सी.+एम.एस्सी. (अॅक्च्युरीअल
सायन्स) संयुक्त अभ्यासक्रम
उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागात विमाशास्त्रातील बारावीनंतर करता
येणारा पाच वर्षांचा बी.एस्सी.+एम.एस्सी. (अॅक्च्युरीअल सायन्स) हा संयुक्त
अभ्यासक्रम २०१०-११ या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. भारतात असा कोर्स
दोन-तीनच विद्यापीठात सुरू असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे त्यापैकी एक
विद्यापीठ आहे. उमवितील या
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील बारावी
उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून त्याने गणित विषय अभ्यासलेला असावा. तसेच त्यास
गणित विषयात कमीत कमी ७०% गुण असावेत.
एम.एस्सी. अॅक्च्युरीअल सायन्स या
पाच वर्षांच्या कोर्सला प्रवेशित विद्यार्थ्यांनी प्रथम तीन वर्षे यशस्वीपणे पूर्ण
केल्यानंतर त्यांना बी.एस्सी. अॅक्च्युरीअल सायन्स ही पदवी देण्यात येणार आहे व
पूर्ण पाच वर्षे यशस्वीपणे अभ्यासल्यास एम.एस्सी. अॅक्च्युरीअल सायन्स ही पदवी
देण्यात येईल. या अभ्यासक्रमात गणित, संख्याशास्त्र, अर्थशास् त्र, वित्त
इत्यादी विषयांवर आधारित पेपर्स असून परदेशी भाषाही शिकवली जाणार आहे. तसेच
विद्यार्थ्यांच्या संवाद व अन्य जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने या
अभ्यासक्रमात Effective Communication in English या
विषयाचादेखील समावेश करण्यात आला आहे. एम.एस्सी.च्या अखेरच्या सत्रात
विद्यार्थ्यांनी विविध वित्तीय, बँकिंग व विमाशास्त्रीय संस्थात
जाऊन प्रोजेक्ट करावयाचा असून यातून या विद्यार्थ्यांना संस्थांची कार्यप्रणाली
समजण्यास उपयोग होईल. विमाशास्त्राचा पाया हा मुळातच भविष्यात होऊ शकणाऱ्या
वित्तीय घटनांच्या अनिश्चिततेवर आधारित असल्यामुळे संख्याशास्त्र या विषयाचेही
विशेष महत्त्व आहे. विमाशास्त्राशी निगडित Mathematics
of Demography, Financial Mathematics, Life Insurance, Actuarial Risk
Management, Health and Care Insurance अशा विविध विषयांचा अभ्यासक्रमात
समावेश असून या शिवाय काही Computer Languages,
Statistical व Financial Software देखील
शिकविण्यात येतात.
एम.एस्सी. अॅक्च्युरीअल सायन्स या
संयुक्त कोर्सचा अभ्यासक्रम हा मुंबई येथील Institute
of Actuaries of India (IAI) घेत असलेल्या परीक्षांच्या
अभ्यासक्रमांशी मिळताजुळता असून या कोर्सला प्रवेशित विद्यार्थ्यांनी IAI च्या
परीक्षादेखील उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. IAI ही संस्था कुठल्याही शाखेच्या
बारावी उत्तीर्ण व इंग्रजी विषय अभ्यासलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपरीक्षेद्वारे
सदस्यत्व देते. तसेच अभियांत्रिकी, लेखा(CA), गणित, संख्याशास्त्र, इत्यादी विषय अभ्यासणारे अथवा पदवीधर
विद्यार्थी प्रवेश परीक्षा देण्यास पात्र असतात.
प्रवेशित विद्यार्थ्यांची चार
स्तरांवर १६ ते १९ विषयांची परीक्षा घेत असते. या परीक्षा वर्षांतून दोन वेळेस
घेण्यात येतात. या सर्व किंवा काही विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना IAI तर्फे
योग्य त्या Specialization च्या
पदव्या व पदे दिली जातात. सर्व विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस अॅक्च्युरी
असे संबोधले जाते. उमवितील या नवीन अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांना
निश्चितच IAI या
परीक्षांची तयारी उत्तम रीतीने करता येईल व त्यातून विमाशास्त्रातील तज्ज्ञ
मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील
संख्याशास्त्र विभागात २००७-०८ या शैक्षणिक वर्षांपासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
इन अॅक्च्युरीअल सायन्स (PGDAS) हा अभ्यासक्रमदेखील सुरू आहे. गणित
शास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. आर. एल. शिंदे यांना २०१० पासून दर वर्षी मे-जून या काळात कॅनडा येथील कॅलगरी विद्यापीठात अॅक्च्युरीअल
सायन्सशी निगडीत विषय शिकविण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. त्यांनी त्या
विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, तेथील कार्यपद्धती, अॅक्च्युरीअल
सायन्सशी निगडित विविध कोर्सेस संदर्भातील सखोल माहिती घेतलेली आहे. हा कोर्स सुरू
करण्याकरीता कॅलगरी विद्यापीठाचे प्रा. डॉ. जगन्नाथ वाणी यांचे मोलाचे सहकार्य
विद्यापीठास लाभले आहे. भारतातील विद्यार्थ्यांनी विमाशास्त्रासारख्या
महत्त्वाच्या विषयाकडे वळून विमाशास्त्रातील तज्ज्ञांची कमतरता भरून काढावी, या उद्देशाने या
अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा
असून पुढील काही वर्षांत IAI च्या
अभ्यासक्रमांच्या परीक्षा व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हा नवीन अभ्यासक्रम
समतुल्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विमाशास्त्राचा हा अभ्यासक्रम
पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक, वित्तीय संस्था, विमासंस्था तसेच शैक्षणिक
व संशोधन संस्थात नोकरीच्या संधी मिळू शकतील. याशिवाय त्या विद्यार्थ्यांना विविध
बँकिंग व विमा संस्थांचे सल्लागार किंवा विश्लेषक म्हणूनही काम करण्याची संधी
प्राप्त होऊ शकेल. बी.एस्सी.+ एम.एस्सी. अॅक्च्युरीअल
सायन्स हा अभ्यासक्रम अतिशय रोजगाराभिमुख आहे.
उमवितील संख्याशास्त्र विभागात २०१२-१३ या शैक्षणिक वर्षासाठी बी.एस्सी.+
एम.एस्सी. अॅक्च्युरीअल सायन्स या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु झालेली
असून प्रवेशअर्ज व माहितीपत्रक www.nmu.ac.in या विद्यापीठाच्या
संकेतस्थळावर तसेच संख्याशास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी विद्यार्थ्यांनी
संख्याशास्त्र विभागास भेट द्यावी किंवा ०२५७-२२५७४९४/६५/६६ येथे संपर्क साधावा.
2 comments:
Why take / what is an actuarial exam?
Like other top-ranked professions (such as law and medicine), one must pass a set of examinations to achieve professional status as an actuary. Unlike other professions, in actuarial science you'll have the opportunity to work as an actuary while completing the examination process. Employers often allow study time during working hours, pay exam fees, provide internships, and even award raises for each exam passed.
Thanx Kalpesh
Post a Comment